Maze Maharaj (माझे महाराज)

महाराजांची स्तुतीसुमने गाण्यासाठी सामान्य माणसाचे शब्द कितीही तोकडे पडले तरीही त्यांच्या विचारांचा सतत अभ्यास केल्याने सामान्य माणसाचे जीवन बदलून तो असामान्य होण्याच्या मार्गाला नक्कीच लागतो याबद्दल कोणताही संदेह नाही. भावमुद्रेमधील प्रतिमा तुम्हाला नामस्मरण करण्याची स्फूर्ती देतात.

वाट हरवलेल्या पिल्लाला जशी आईची ओढ असते तशीच संसारात फसलेल्या मनुष्याला निश्चित वाट दाखवण्याच्या गुरुची आवश्यकता असते. कलियुगामध्ये अखंड नामस्मरणाचे माहात्म्य जाणलेल्या योगी पुरुषाच्या मार्गदर्शनाने माणूस प्रापंचिक सागरातून तरुन जातो हेही तितकेच खरे आहे.

“माझे महाराज” या पुस्तिकेमध्ये महाराजांची शिष्यपरंपरा त्याच्या प्रतिमेसहित दिलेली आहे. काही पुस्तके वाचल्याने माणसामध्ये आमूलाग्र बदल होतो असे म्हणतात, पण अशी पुस्तकांमध्ये दिलेल्या सविस्तर विचारांमुळे माणसाची एकाग्रता वाढीस लागून तो जीवनाच्या बारीक पैलूंचा विचार करण्यास सक्षम होतो.

प्रपंच आणि परमार्थातली दरी कमी करून आध्यात्म रोजच्या जीवनात कसे सहजपणे आचरणात आणता येईल यासाठीचे अनेक उपाय या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळून येतील. श्री महाराजांच्या अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन आपण सारे जण कर्माचा सर्वश्रेष्ठ अविष्कार साधून ज्ञानसागरात न्हाऊन जाऊयात.

350.00

- +
Weight0.322 kg
Dimensions100 × 175 × 25 mm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Maze Maharaj (माझे महाराज)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Maze Maharaj (माझे महाराज)Maze Maharaj (माझे महाराज)
350.00
- +